मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):-
अगदी काही तासांवर गणरायाचे आगमन आले आहे…मुंबईत घरोघरी तसेच मंडळांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना करून परंपरेप्रमाणे पूजन केले जाते…मुंबईत मंडळाच्या गणपतीचे मोठे आकर्षण असते…अनेक मंडळे गेली अनेक दशके गणपती बसवतात…यापैकी काही मंडळे जगभरात पोहचली आहेत…यातील एक म्हणजे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा…गणेश चतुर्थी आणि पुढील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजा मंडळाने लालबागच्या राजाची पहिली झलक दाखविली…हजारो भाविक या सोहळ्याला उपस्थित होते…राजाची पहिली झलक समोर येताच भाविकांनी जयजयकार केला…यावर्षी पारंपरिक पद्धतीने लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आली…डोळे दिपवणारे असे लालबागच्या राजाचे रूप पाहायला मिळाले… मनमोहक रूप आणि मरून रंगाच्या वेलवेटच्या पितांबरमध्ये राजाचे भव्य रूप पाहायला मिळाले…यावर्षी लालबागच्या राजाला काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आली आहे…पहिली झलक समोर आल्यानंतर अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात राजाचे भव्य रूप कैद केले…विशेष म्हणजे यंदा लालबागच्या राजाला सोन्याचा मुकुट घालण्यात आला आहे…यंदाचे लालबागच्या राजाचे हे 91 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे…