मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
गौरी-गणपती सणाला अवघे काही तास शिल्लक आहेत…चाकरमान्यांची कोकणात जाण्यासाठी लगबग सुरु आहे…त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे…या वाहतुकोंडीतून सुटका होण्यासाठी आता एसटीच्या गाड्या अटल सेतूचा वापर करीत आहेत…६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून अटल सेतूचा वाहतुकीसाठी वापर केला जात आहे…मुंबईतील विविध भागातून चाकरमानी कोकणात जात असतात…त्यामुळे मुंबई, नवी मुंबई,कळंबोली, पनवेल परिसरात मोठी वाहतूककोंडी होते…मात्र आता अटल सेतूचा वापर होत असल्याने या वाहतूककोंडीला शह बसला आहे…मुंबईतील कोकणात जाणाऱ्या एसटीच्या गाड्या अटल सेतूवरून उरणमार्गे खारपाडा येथे बाहेर पडून मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जात आहेत…कोकणात जाणाऱ्या ज्या एसटी गाड्यांचे ग्रुप निहाय आरक्षण आहे…आणि स्वतः प्रवासी टोल भरण्यास तयार आहेत…अशाच गाड्यांना अटल सेतूवरून सोडण्यात येत असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकारी यामिनी जाधव यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला दिली…७ सप्टेंबरपर्यंत ग्रुप निहाय आरक्षित गाड्या अटल सेतूवरून धावणार आहेत…