शिवसत्ता टाइम्स उरण (प्रवीण पाटील) :-
उरण तालुक्यातील प्रसिद्ध चिरनेर गावाला भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी आपल्या कुटुंबासह लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू श्री महागणपतीचे दर्शन घेतले.तसेच २५ सप्टेंबर १९३० सालच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले.
चिरनेर गावचे रहिवासी असलेल्या तथा ठाणे शहरातील उद्योजक अनिल मुंबईकर व त्यांच्या पत्नी सौ साधना अनिल मुंबईकर यांनी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा तसेच सौ शारदा सुरेश म्हात्रे यांचे स्वागत केले.यावेळी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आपल्या कुटुंबासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू श्री महागणपती चरणी विधीपूर्वक पूजा करुन श्री महागणपतीचे व स्वयंभू शिव मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले.तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले.याप्रसंगी उद्योजक अनिल मुंबईकर यांनी ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावाची माहिती खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना दिली.यावेळी चिरनेर गावचे उद्योजक राजा शेठ खारपाटील , सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचे चिरनेर नगरीत स्वागत केले.याप्रसंगी डॉ राजेंद्र पाटील ,पांडुरंग मुंबईकर, जनार्दन पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील,सह इतर मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.