Sunday, November 24, 2024
HomeUncategorizedकोकणमाहेरी येणाऱ्या गौरीचे उत्साहात घरोघरी आगमन... श्रीवर्धनमधल्या दांडा कोळीवाड्यात गौराईचे आगमन...

माहेरी येणाऱ्या गौरीचे उत्साहात घरोघरी आगमन… श्रीवर्धनमधल्या दांडा कोळीवाड्यात गौराईचे आगमन…

कोकण शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):- 

माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचे म्हणजेच गौरीचे लिंबोलन उतरवून स्वागत केले जाते…माहेरी येणाऱ्या गौरीचे जोरदार उत्साहात घरोघरी आगमन झाले… श्रीवर्धनमधल्या दांडा कोळीवाडा येथे गौरी गणपतीचे आगमन पारंपारिक पद्धतीने करण्यात आले…पारंपरिक कोळी वेशभूषा परिधान करत पुरुष मंडळी जागरण व गौरी गणपतीच्या प्राचीन संस्कृती असलेल्या फेऱ्यांच्या गाण्यावर ठेका धरत ध्यानमग्न झाले…प्राचीन संस्कृती असलेल्या गौरी मातेच्या आगमनाला श्रीवर्धनमधला संपूर्ण दांडा कोळीवाडा पारंपरिक वेशभूषा परिधान करत भक्तीभावाने तल्लीन झाला…विशेषतः प्राचीन संस्कृतीपासून गौरी गणपती च्या आगमनाला महिलांच्या जोडीला पुरुष मंडळी पारंपरिक फेऱ्यांची गाणी, भारूड, गीत रामायण, संगीत गवळण सारख्या संस्कृती जपणाऱ्या उत्सवात मोठया आनंदाने भक्तिमय भावाने सहभागी होतात…
रायगड कोकणात निसर्गरम्य आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या श्रीवर्धन गावाला एक सांस्कृतिक ओळख आहे…प्रत्येक घरात गौरी गणपतीला मोठया भक्तिमय वातावरनात पुरुष मंडळी, अगदी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पारंपरिक कोळी वेशभूषा परिधान करत पायात घुंगरू बांधून फेर धरून तालात सुरात अवघे रंगून निघाले…हा प्रसंग अगदी मन तृप्त करणारा होता…श्रीवर्धन दांडा कोळीवाड्यात गौरी आवाहन, गौरी पूजन असा दोन दिवस जागरणाचा उत्सव साजरा करण्यात येतो.यात पुरुष मंडळी गौरी आवाहन यादिवशी जागरण करतात….कोकण म्हटल कि आठवत निसर्गाचा स्वर्ग, निसर्गाच्या सानिध्यात दडलेल्या कोकणाला स्वर्ग म्हटले जाते. याच कोकणात विशेषतः गौरी गणपतीचा सण मोठया उस्ताहात आणि भक्तीभावाने, आनंदाने, साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रमधील कोकणात राहणारे चाकरमनी गौरी गणपतीच्या सणाला आवर्जून आपल्या कोकणातील गावी जातात. प्रत्येकाच्या घरात गौरी गणपतीचे आगमन केले जाते. प्रत्येकाच्या घरात आनंदीमय, सुख, समृद्धीने भरलेले वातावरण असते…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments