पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
नवऱ्याला सोडून घरी आलेल्या मुलीवर आईने निर्बंध घातले होते… त्यामुळे आईला कायमचे संपविण्यासाठी पोटच्या मुलीने १० लाखाची सुपारी आपल्या मित्रांना दिली होती… त्यानुसार आईचा काटा काढण्यात आला… याप्रकरणी मुलीसह तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे… प्रिया नाईक वय ४४ असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.पनवेल शहरातील माणीकनगर सोसायटीमध्ये प्रिया नाईक आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. शुक्रवारी दि.१३ सप्टेंबर रोजी प्रिया यांचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता… पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता प्रथमदर्शी प्रिया नाईक यांचा दोरी किंवा वायरने गळा आवळून खून केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास सुरू केला. तपास करताना काही धागेदोरे हाती लागल्याने पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले… त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली… यामध्ये खून झालेल्या महिलेच्या मुलीचा देखील सहभाग होता… नवऱ्याला सोडून घरी आलेल्या मुलीवर आईने निर्बंध घातले होते… त्यामुळे आईला कायमचे संपविण्यासाठी पोटच्या मुलीने १० लाखाची सुपारी आपल्या मित्रांना दिली होती… अशी माहिती पनवेल पोलिसांनी पत्रकारांना दिली…