रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहार):-
दि.१६/०९/२०२४ (१० दिवस), दि.१७/०९/२०२४ (११ दिवस-अनंत चतुर्दशी) व दि. १८/०९/२०२४ (१२ दिवस) या दिवशी श्री गणेशाचे विर्सजन होत आहे… श्री गणेशाचे विसर्जनावेळी मिरवणूकीमध्ये ठिकठिकाणी डॉल्बी साऊंड सिस्टीम / स्नो स्प्रे, हिट स्प्रे / लेझर बीम लाईटसचा वापर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाव्दारे केला जातो… श्री गणेश विसर्जन मिरवणूकीत ध्वनीक्षेपकांच्या दणदणाटामुळे काही नागरीकांना बहिरेपणाची समस्या तसेच काहींना हृदय विकाराचे झटके आल्याच्याही घटना घडल्या आहेत… विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा झाल्याचे प्रकार घडले आहेत. लेझर बीम लाईटमुळे नागरीकांचे तसेच मिरवणूक बंदोबस्ताकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी/ अंमलदारांचे आरोग्याचे प्रश्न उपस्थित झाले आहेत…तरी रायगड जिल्ह्यात अशी कोणतीही अप्रिय घटना घडून नागरीकांचे तसेच मिरवणूक बंदोबस्ताकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी/अंमलदारांचे आरोग्याचे प्रश्न उपस्थित होणार नाही याकरीता आदेश होण्याबाबत पोलीस अधीक्षक, रायगड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विनंती केलेली आहे…. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) या कलमानुसार जेथे कोणत्याही कारणाने नागरीकांच्या जिवितास अथवा आरोग्यास धोका निर्माण होईल असे पुरेसे कारण असेल तेव्हा तात्काळ प्रतिबंध करण्याची तरतुद आहे… त्यानुसार अप्पर जिल्हादंडाधिकारी संदेश शिर्के यांनी रायगड जिल्हयात दि.१६/०९/२०२४ ते दिनांक १८/०९/२०२४ रोजीपर्यंत श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध लागू केले आहेत…
गणेश मिरवणुकीत लेझर लाईटला बंदी…वाद्यांच्या दणदणाटामुळे हृदयविकार, बहिरेपणा…
RELATED ARTICLES