माणगाव शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावातील जोशी वडेवाले हॉटेलमध्ये गरोदर महिला, लहान मुली, ग्राहक यांना मारहाण झाल्यानंतर लोकांनी या हॉटेलविरोधात उठाव केला… त्यानंतर या हॉटेलची दुसरी बाजू उजेडात आली… हॉटेलचे नाव जोशी वडेवाले असल्याने…सज्जन मराठी माणसाचे हॉटेल समजून मराठी ग्राहक या हॉटेलमध्ये जात होता… जोशी नाव म्हणून हॉटेलमधील पदार्थ सोज्वळ,सात्विक,आहारवर्धक आहेत… अशी लोकांची समजूत असायची…पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनावर हेच बिंबवलेले आहे की…जोशींकडील खाद्यपदार्थ सात्विक असतात…तेथे स्वच्छता,टापटीपपणा असतो…त्यामुळे हॉटेलचे जोशी वडेवाले नाव बघून लोक हॉटेलमध्ये जात होते…लोकांची ग्राहक म्हणून एवढी संख्या वाढली की जोशींनी विविध ठिकाणी आपल्या जोशी वडेवाले हॉटेलच्या शाखा काढल्या … महामार्गावर लोकांना जोशी वडेवाले हॉटेलचे नाव दिसले की लोक सरळ गाड्या थांबवून नाश्त्याला जातात…हे हॉटेल जोशी वडेवाल्यांचेच आहे… त्यामुळे येथे पदार्थ सोज्वळ,सात्विक,आहारवर्धक मिळतील…अशी ग्राहकांची धारणा राहिली…मात्र लोकांचा हा गोड गैरसमज होता…कारण जोशी वडेवाल्यांनी आपल्या नावाचा,प्रसिद्धीचा व्यापारासाठी वापर केला…त्यांच्या नावाने चालणाऱ्या हॉटेलमध्ये मूळ जोशी वडेवाल्यांचे खाद्यपदार्थ मिळत नव्हते… तर हॉटेल चालवणारा आपल्या पद्धतीने खाद्यपदार्थ बनवून विकत होता… ते खाद्यपदार्थ जोशी वडेवाल्यांचे नव्हते… तर ते खाद्यपदार्थ त्या हॉटेलवाल्याचेच असायचे…हॉटेलला नाव फक्त जोशी वडेवाल्यांचे असायचे…हॉटेलला नाव देण्यामागे पैशाचा व्यवहार असायचा…अशी माहिती आता चर्चेतून पुढे येत आहे… पैशासाठी जोशी वडेवाल्यांनी परप्रांतीय पोसले …असेही बोलले जात आहे… जोशींसारखाच वडा,चटणी हे हॉटेल चालविणारे बनवत नव्हते… त्यामुळे जोशी वडेवाले हे आपले नाव इतरांना वापरायला देऊन ग्राहकांची फसवणूक करत होते … ही एक प्रकारे व्हाईट कॉलर बदमाशी असल्याची चर्चा आहे…त्यामुळे जोशी वडेवाले यांच्यावर कारवाई होणार काय ?असा लोकांचा थेट सवाल आहे… दरम्यान लोकांमधील चर्चेतून पुढे आलेली दुसरी माहिती अशी की… एखादा व्यवसाय,दुकान,हॉटेल,व्यापार यशस्वी झाला की त्याच्या नावाने इतरत्र दुसरी शाखा काढली जाते… कधीकधी जास्त शाखा काढून त्या कमिशनवर चालवायला दिल्या जातात..शक्यतो ज्या काही शाखा काढल्या जातात त्या मूळ मालकच चालवतो… कारण पदार्थांच्या,वस्तूंच्या गुणधर्मांवर परिणाम होऊ नये… अशी मूळ मालकाची इच्छा असते… तरीही कमिशनवर एखादी शाखा दुसऱ्याला चालवायला दिल्यावर तेथील विक्रीचे पदार्थ,वस्तू या मूळ मालकाच्याच असतात…पॅकिंगचे खाद्यपदार्थ,किंवा एखादी दुसरी वस्तू मूळ मालकाचीच असते… मात्र जोशी वडेवाले यांनी हॉटेलच्या शाखा काढून इतर लोकांना चालवायला दिल्या…त्या जोशी वडेवाले हॉटेलमधून जोशींचेच खाद्यपदार्थ जसे बटाटावडा,चटणी आणि इतर पदार्थ दिले जायचे का ?जोशी वडेवाले तसे पदार्थ पॅकिंग करून पाठवत होते का ? बटाटावडयाचे मिश्रण जोशी वडेवाल्यांकडून येत होते का ?की हॉटेलवाला स्वतःचे पदार्थ जोशी वडेवाल्यांचे नाव वापरून खपवत होता का ?अशा अनेक सवालांनी ग्राहकांच्या डोक्यात केमिकल लोचा झालाय…