पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):
पनवेल तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पळस्पेजवळील पुणे लेनवर दि.९ सप्टेंबर रोजी ९:३० वाजता सुमारास मध्यप्रदेश राज्यातील ट्रकचालक लघुशंकेला थांबला असता त्याला खालापुरातील दरोडेखोरांच्या टोळीने लुटले होते… या घटनेचा पनवेल तालुका पोलिसांनी आठवड्यात तपास लावून दरोडेखोरांना जेरबंद केले… निव्वळ तांत्रिक तपासावर पनवेल पोलिसांनी ही कामगिरी केली… ट्रक क्रमांक एम.एच १४ के क्यु ५००८ मंदिलाल रामगरीब पटेल, वय ३५ राहणार समारासाठ बैंक राजीव गांधी प्राथमिक विद्यालय, पो. अभिलकी २५, जि. रिवा, राज्य – मध्यप्रदेश हा चालवत होता… ट्रक चालकाला दरोडेखोरांनी जिवे ठार मारण्याची धमकी… त्यानंतर हात बुक्क्यांनी मारहाण… करून जखमी केले… त्याच्याकडील २ मोबाईल हॅन्डसेट व २३,०००/- रुपये रोख रक्कम मारहाण करुन चोरून नेली… याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे बी. एन. एस. कलम ३०९(४), ३०९(६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता…
सदर दाखल गुन्हयाचा तपास पोलीस आयुक्त, नवी मुंबई मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अति. पोलीस आयुक्त, दिपक साकोरे यांच्या आदेश व सुचनांप्रमाणे तसेच पोलीस उप आयुक्त, परि. २, पनवेल प्रशांत मोहिते व सहा पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, अशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या स्वतंत्र पथकाने लावला… गुन्ह्याचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना पोलिसांनी तांत्रिक व गोपनिय माहितीद्वारे तपास लावला… एकूण ८ दरोडेखोर होते… १) रोहन उर्फ गुड्डु गोपीनाथ नाईक, वय २४ वर्षे, २) रोहिदास सुरेश पवार, वय २३ वर्षे, ३) आतेश रोहिदास वाघमारे वय २६ वर्षे ४) मनीष काळुराम वाघमारे वय ३५ वर्षे सर्व राहणार निंबोडेवाडी तालुका खालापूर, जि. रायगड यांना १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री खालापूर परिसरातून अटक केली… तर ५) शंकर चंदर वाघमारे, वय १८ वर्षे ५ महिने यालाही ११.२४ वाजता सापळा रचून पकडले… या गुन्हयातील इतर ०३ आरोपींचा शोध सुरू आहे… अटक आरोपींना दि. २० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.
अटक आरोपींकडुन १) ४१,०००/-रु कि. चे ०५ मोबाईल फोन व २) ७,०००/- रु. रोख रक्कम असा एकूण
रु. ४८,०००/- हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे… या ८ दरोडेखोरांपैकी रोहन उर्फ गुड्डू हा नामचीन आहे… त्याच्यावर यापुर्वी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे ०२ व खालापुर येथे ०१ जबरी चोरी व दरोडयाचा गुन्हा दाखल झालेला आहे…
या गुन्ह्याचा तपास पोनि (गुन्हे) श्री. शेलकर, सपोनि. अनुरूद्ध गिजे, पोउपनि. हर्षल राजपुत, पोहवा. १६० विजय देवरे, पोहवा. २७०० सुनिल कुदळे, पोहवा. महेश धुमाळ, पोहवा. १८५७ शिवाजी बाबर, पोहवा. २०४२ सतीश तांडेल, पोलीस हवालदार ९३ वैभव शिंदे, पोशी. १२३४० राजकुमार सोनकांबळे, पोशि. ३८६९ आकाश भगत, पोशि. ३६१३ भिमराव खताळ, पोहवा. ९३ वैभव शिंदे, पोशि. ३४६७ प्रविण पाटील यांनी लावला…
रस्त्यावरील अशा प्रकारच्या लूटीला पोलीस प्रशासनाकडुन प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने… रात्रीचे वेळी प्रवासा दरम्यान वाहनचालकांनी आपले वाहन ज्या ठिकाणी पोलीस चौकी किंवा अधिकृत थांबा असलेल्या अमेटी युनिव्हर्सिटी लगत पार्किंगच्या ठिकाणी थांबवावे… असे मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे वरून प्रवास करणा-या वाहन चालकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे…