Wednesday, October 9, 2024
Homeअपघातबस आणि मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक...अपघातात तिघे मोटरसायकलस्वार तरुण जागीच ठार...

बस आणि मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक…अपघातात तिघे मोटरसायकलस्वार तरुण जागीच ठार…

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत) :- 

पाली खोपोली राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे…या राज्य महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे…एका पाठोपाठ जीवघेणे अपघात घडत आहेत…. बुधवार दि.18 सप्टेंबर रोजी दुपारी पाली खोपोली राज्य महामार्गावर कानसळ गावाजवळील नेव्ही कॉलेज समोर बाईकस्वार स्कूल बसला धडकून अपघात झाला. या अपघातात बाईकरील तिघेजण ठार झाले आहेत…या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
श्रीराज एज्युकेशन सेंटरची स्कुल बस घोटावडे येथून शाळकरी मुलांना पालीकडे घेऊन जात होती…यावेळी पाली बाजूकडून खोपोलीच्या दिशेने वेगाने आलेला बाईकस्वार स्कूल बसला जाऊन धडकला…या बाईकवर तिघेजण प्रवास करत होते…यावेळी स्कूलच्या पाठीमागून येणाऱ्या कारच्या कॅमेऱ्यात ही सर्व थरारक घटना कैद झाली आहे… अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम, सहायक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी आदींसह पोलीस उपस्थित होते…यावेळी पोलिसांसह अपघातग्रस्त मदत टीम, अमित खीस्मतराव आदींचे सहकार्य मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments