उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्या १९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील पाणदिवे येथील हुतात्मा परशुराम रामा पाटील यांच्या स्मारकाची पडझड आणि दुरावस्था झाली आहे… फरशा निखळून पडल्या आहेत तर स्मारकाचा रंग उडला आहे… त्याचप्रमाणे पाणदिवे येथील हुतात्मा स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून तेथून चालणे सुध्दा कठीण आहे… त्यामुळे छोटे मोठे अपघातही होत आहेत…
नागरिकांमध्ये, पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे… राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्या शिल्प स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी पाणदिवे गावाला भेट देणारे पर्यटक नागरिक व्यक्त करीत आहेत… ब्रिटिश सत्तेविरोधात उरण, पनवेल तालुक्यातील जनतेने चिरनेरच्या भूमीत २५ सप्टेंबर १९३० साली शांततेच्या मार्गाने आंदोलन उभारले… यावेळी ब्रिटिश सरकारच्या जुल्मी पोलीस यंत्रणेने आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबार केला होता… त्यात पाणदिवे येथील परशुराम रामा पाटील यांना आंदोलन करताना वीरमरण आले… तसेच ३८ आंदोलनकर्ते जखमी झाले होते… हुतात्मा स्मारकांची दुरावस्था झाली असून परशुराम रामा पाटील यांच्या हातातील साहित्य (कोयता) निखळून पडला आहे… तसेच स्मारकाची आणि रस्त्याची दुरावस्था झाली आहे… हुतात्म्यांच्या हातातील ध्वजाची, अंगावरील कपड्यांची पडझड झाली आहे… तरी या स्मारकाला नवा लूक प्राप्त करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष दयावे अशी पाणदिवे येथील हुतात्मा परशुराम रामा पाटील यांचे नातु भाईचंद पाटील यांनी मागणी केली आहे.