महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
रायगड जिल्ह्यात 25 सप्टेंबर 1930 साली स्वातंत्र्य प्राप्तीसाठी चिरनेर तालुका उरण जिल्हा रायगड येथे जंगल सत्याग्रह झाला…. ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या जंगलात आदिवासींनी प्रवेश करून गवत कापून सत्याग्रह केला होता… त्या सत्याग्रहींवर ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला. यात आपला हुतात्मा नाग्या कातकरी धारातीर्थ पडला… आता सर्वत्र हुतात्मा नाग्याच्या नावे आदिवासिंच्या हक्काची चळवळ उभी राहिली आहे… 200 वर्षांपासून होत असलेल्या ऐतिहासिक अन्यायाचे परिपार्जन करण्याच्या उद्देशाने वनहक्क कायदा करण्यात आला… आजचा हा दिवस हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा 94 वा स्मृतिदिन महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभाग आदिवासी समाज नरवण आदिवासी वाडी येथे साजरा करण्यात आला… यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले तसेच नरवण आदिवासी वाडी ते नरवण काजू फाटा पर्यंत ढोल ताशाच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली… खाडीपट्टा विभागातील लहान, मोठ्यांसह या मिरवणुकीत सहभागी झाले होते… यावेळी आलेल्या मान्यवरांचे व खाडीपट्टा विभागातील नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला खाडीपट्टा विभागातील महिला, पुरुष त्याचप्रमाणे लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते…