मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी उच्च न्यायालयात बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली… या सुनावणीवरून न्यायमूर्तींनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले आहेत… न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.अक्षय शिंदे याने पोलीस वाहनात पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर गोळीबार केला, असा दावा पोलिसांचा आहे… याबाबत न्यायमूर्तींनी “पोलिसांची पिस्तुल अक्षयने कशी हिसकावली… ती आधीच लोड कशी काय होती? यावर आमचा विश्वास बसत नाही… कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही… कोणताही कमजोर माणूस पिस्तुल लोड करू शकत नाही. तुम्हाला पिस्तुल वापरता येते का? मी १०० वेळा तरी वापरली आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो”, अशा शब्दात न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वकिल आणि पोलिसांसमोर सवाल उभे केले… न्यायमूर्ती मोहिते डेरे यांनी मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी केव्हा नेला? त्याचा व्हिडिओग्राफ आहे का? मृत्यूचे नेमके कारण काय? अक्षयला आणि ऑफिसरला नेमकी कोठे दुखापत झाली?… असा सवाल सरकारी वकिलांना केला…
सरकारी वकीलांनी यावर मृतदेह सकाळी ८ वाजता जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदनाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. डोक्यात आरपार गोळी गेली होती. पोलीस अधिकाऱ्यालाही गोळी छेदून गेली… असे सांगितले…. न्यायमूर्ती चव्हाण यांनी… फॉरेन्सिक चाचणी झाली का? ते कोणतं शस्त्र होते? पिस्तुल लोड झाली होती का? त्याला पिस्तुल लोड करता येत होती का?… असे सवाल केले… सरकारी वकीलांनी… झटापटीत ती पिस्तुल लोड झाली… असे उत्तर दिले… न्यायमूर्ती चव्हाण यांनी पुन्हा सवाल केला…पोलिसांची पिस्तुल अक्षयने कशी हिसकावली. ती आधीच लोड कशी काय होती? यावर आमचा विश्वास बसत नाही. कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. कोणताही कमजोर माणूस पिस्तुल लोड करू शकत नाही. तुम्हाला पिस्तुल वापरता येते का? मी १०० वेळा तरी वापरली आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो…. असे न्यायमूर्ती म्हणाले… गंभीर गुन्हा असलेल्या माणसाला घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का दाखवला?… याबाबत नियमावली काय आहे? त्याच्या हाताला बेड्या होत्या का? असा सवालही न्यायमूर्तींनी केले… सरकारी वकील वेनेगावकर म्हणाले… त्याच्या हाताला बेड्या होत्या. पण त्याने पाणी मागितले… अक्षयने तीन गोळ्या झाडल्या… एक गोळी पोलिसाला लागली…. मग इतर दोन गोळ्या कुठे आहेत? आपण स्वसंरक्षणाकरता अशा परिस्थितीत पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जाते… न्यायमूर्तींच्या या सवालावर सरकारी वकिलांनी… पोलिसांनी विचार केला नाही… त्यांनी घटनेवर तात्काळ हालचाल केली… असे स्पष्ट केले…