Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडचिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९४ वा स्मृतिदिन... बंदुकीच्या गोळ्या झाडून हुतात्म्यांना मानवंदना...

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९४ वा स्मृतिदिन… बंदुकीच्या गोळ्या झाडून हुतात्म्यांना मानवंदना…

उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-   

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० साली झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९४ वा स्मृतीदिनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक  २५ सप्टेंबर रोजी संपन्न झाला… यावेळी शासकीय इतमामाने पोलिसांनी बंदूकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना दिली…  देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनाअंतर्गत देशभरात आंदोलने सुरु होती. इंग्रज भारत छोडोचा… नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता.त्याचवेळी चिरनेर येथेही २५ सप्टेंबर १९३० साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरु होते…

शांततामय मार्गाने सुरु असलेल्या जंगल सत्याग्रहात शेतकरी, आगरी, आदिवासी असे सुमारे दोन हजार आंदोलक सहभागी झाले होते. यामध्ये २० ते २२ वयोगटातील युवकांचाच अधिक सहभाग होता. जंगल का कायदा तोड दिया… इंग्रज भारत छोडोचा नारा देत चिरनेर येथील आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछुट लाठीचार्ज,गोळीबार केला…  या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादेव कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे),रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे) आनंदा माया पाटील (धाकटी जुई),आलु बेमट्या म्हात्रे (दिघोडे) असे  उरण तालुक्यातील आठजण शहीद झाले… तर अनेकजण जखमी झाले…

स्वातंत्र्य लढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हा लढा देशभरात प्रसिध्द आहे. या लढ्यात उरण तालुक्यातील धारातिर्थी पडलेल्या आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरातील त्यांच्या मुळगावी उभारली आहेत. स्वातंत्र्य संग्रामातील या महत्वाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे सर्वांनाच स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत राहावी यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी चिरनेर येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यानंतर हुतात्म्यांच्या वारस, कुटुंबातील सदस्यांचा यथोचित, सन्मान करण्यात येतो.

याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर,माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, उद्योजक पी. पी. खारपाटील, उद्योजक राजाशेठ खारपाटील,ईसीपी विशाल नेव्हुल, उद्योजक जे.एम.म्हात्रे,शेकापचे युवा नेते प्रितम म्हात्रे , उरण तहसीलदार डॉ उध्दव कदम, कामगार नेते दिनेश पाटील,भुषण पाटील, रविंद्र पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपा तालुकाध्यक्ष रवि शेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, गटविकास अधिकारी समीर वाठारकर,उरण पो. नि.राजेंद्र मिसाळ,चिरनेर सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत, शेकापचे नारायण घरत, माजी सभापती नरेश घरत,मा उपसभापती शुभांगी सुरेश पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार,मेधाताई आदी मान्यवर सह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते,ग्रामस्थ, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच भास्कर मोकल यांनी केले तर  सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी केले… या कार्यक्रमाचे औचित्य साधून चिरनेर गावच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या पी. पी. खारपाटील कंपनीचे संचालक पी. पी.   खारपाटील, राजाशेठ खारपाटील,  समीर खारपाटील, सागर खारपाटील यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments