रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून रोह्यातील मुख्य रस्त्यावर न झालेल्या दुभाजनाचा विषय चांगला चर्चेत होता. यामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांना गंभीर दुखापत तर अनेकांना हात पाय फ्रॅक्चर सुद्धा झाले होते. तसेच वाहतूक कोंडीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात डोकेदुखी रोहेकरांना सहन करावी लागत होती. यामुळे रोहेकरांनी हे विभाजन झालेच पाहिजे! असं सोशल मीडियावर चांगलं विषय धरून ठेवल होत याची दखल रायगडचे खासदार सुनील तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी घेतली व रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे यावर चर्चा करिता खुली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये असंख्य रोहेकर माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे माजी सर्व नगरसेवक तसेच ,समाजसेवक सहभागी होते. या चर्चेमध्ये अखेर असे निश्चित झाले रोह्यामध्ये रस्त्याचे दुभाजन करणे हे खूप गरजेचे आहे. यामुळे खासदार तटकरेंनी यावर हिरवा कंदील दाखवत अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले व काम सुरू करण्यास सांगितले या विभाजनामुळे रोह्याला एक वेगळे सौंदर्य निर्माण होणार आहे त्यामुळे रोहेकरांना वाहतूक कोंडी, अपघात तसेच अनेक समस्येपासून सुटका मिळेल. यामुळे रोहेकर नागरिकांकडून खासदार सुनील तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे यांचे सोशल मीडियावर कौतुकास्पद आभार मानण्यात येत आहे…