चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करू नये म्हणून रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन चौक येथे अंतर्गत रस्त्यावर केले…काल खालापूर तहसीलदार अभय चव्हाण व वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना रास्ता रोको आंदोलनाबाबत निवेदन दिले होते…आदिवासी समाजाची ३० सप्टेंबर २०२४ पासुन संपूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन व निदर्शने होणार आहेत…त्याच धर्तीवर रायगड जिल्ह्याच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी चौक-कर्जत फाटा येथील अंतर्गत रस्त्यावर निदर्शने करण्यात आली…यावेळी आदिवासी महिला व पुरुष उपस्थित होते…
धनगर समाजाला धनगर आरक्षण मिळावे व धनगड ऐवजी धनगर जातीची जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी व सकल धनगर समाज बांधवाच्यावतीने पंढरपूर व लातूर येथे गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण चालू आहे… त्यांना पाठींबा देण्यासाठी २३ सप्टेंबर २०२४ रोजी धनगर समाजाच्यावतीने राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते…धनगर समाज हा अनुसूचित जातीत येत असल्याने त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये असे मोर्चेकरी यांचे म्हणणे होते…मुळातच धनगर समाजाची मागणी चुकीची आहे तिला शासनाने मान्यता देऊ नये, दिल्यास सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.मोरबे धरण कृती समितीचे आंदोलन लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता,अग्निशमन दल,रुग्ण वाहिका याही सज्ज ठेवल्या होत्या.उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम खालापूर यांनी पूर्णपणे दक्षता घेतली होती. खालापूर वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख कामगीरी केली.निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी शासनाच्या वतीने आदिवासी समाजाचे निवेदन स्वीकारून शासनाकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले…