Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडफणसापूर ते चैल-गायचोळे रस्ता तात्काळ करा...राकेश पाटील यांचे कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन...

फणसापूर ते चैल-गायचोळे रस्ता तात्काळ करा…राकेश पाटील यांचे कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन…

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणारा अलिबाग तालुक्यातील मौजे फणसापूर येथून सुरू होणारा व जवळपास चैल-गायचोळे येथे संपणारा अंदाजे 07 किलोमिटरचा रस्ता आहे. सदरच्या रस्त्यावर सुमारे 20 वर्षापूर्वी डांबर पडली होती. त्यानंतर या रस्त्याला डांबरच माहिती नाही हे सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे. सदरच्या रस्त्याचे तात्काळ नुतनीकरण करण्यासाठी तरूण सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेष पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.भारत बास्टेवाड यांना निवेदन दिले आहे… सदरच्या रस्त्याची अवस्था दयनिय झालेली आहे. त्या रस्त्यावरून 1) कुदे 2) सुडकोळी 3) नवखार 4) भागवाडी 5) भोनंग 6) नवघर 7) महान 8) मोरोंडे 9) उमटे 10) रामराज 11) रामराज विभागातील 7 ते 8 अदिवासी वाडया 12) बोरघर 13) ताजपूर 14) मोरखोल 15) भिलजी 16) फणसापूर 17) बापळे 18) दिवी पारंगी 19) चिंचोटी 20) फुडेवाडी 21) चैल कातळपाडा 22) वळवळी 23) वळवळी आदीवासीवाडी सुमारे 23 गावांतील नागरिकांचा रोजच्या रहदारीचा हा रस्ता असून वरील 23 गावांतील विदयार्थी विदयार्थीनी रेवदंडा काॅलेजला याच रस्त्याने जाणारे आहेत…चैल व रेवदंडा या ऐतिहासिक षहरांना जोडणारा कमी वेळ लागणारा रस्ता आहे…आग्राव कोळीवाडयातील कोळी महिला मासे विक्रीसाठी ग्रामीण भागात येण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. मात्र तो रस्ता ही शेवटची घटीका मोजत आहे…सदरच्या रस्त्यावरून 23 गावांतील नागरिक हे ग्रामीण भागांतील असून हातावर पोट भरणारे आहेत…शेती आणि मासेमारी तसेच दुग्ध व्यवसाय करणार येथील नागरिक असून या विभागातील नागरिकांसाठी षेती, शिक्षणासाठी जवळची बाजारपेठ म्हणून चैल रेवदंड्याची बाजारपेठ आहे…येथील 23 गावांतील लोक उदरनिर्वाहासाठी तसेच जे  मोलमजुरी, मासेमारी, दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात ते या रस्त्यावरून जावूच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे…पुर्वी हा रस्ता 20 मिटर रूंदीचा होता…या विभागातील 23 गावांतील नागरिकांना त्यांच्या शेती व शेतीपुरक व्यवसायांना गती देणारा हा एकमेव रस्ता आहे…सदरचा रस्ता नसल्यामुळे वळसा मारून जावे लागत असल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा नाहक वाया जात आहे… या 23 गावातील लोकांची आर्थिक उलाढाल घडवून आणणारी चैल भोवाळे येथील श्री. दत्तची यात्रा डिसेंबर मध्ये 5 दिवस भरते…या यात्रेमध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते…परंतु सदरचा रस्ता नसल्यामुळे येथील नागरीकांना त्याचा फायदा होत नाही…अनेक विद्यार्थी रेवदंडा काॅलेजला जाण्यापासून वंचित राहत आहेत…
विद्यमान सरकारने 17,000 ग्रामिण भागातील रस्ते मार्गी लावल्याची जाहिरात टिव्हीवर झळकते. मग या 17,000 रस्त्यामध्ये हा रस्ता आहे कुठे?रायगड जिल्हा परिशदेच्या माध्यमातून लाखो रूपोयांचा निधी ग्रामीण भागातील रस्त्यासांठी खर्च केला जातो. मात्र वर नमुद रस्ता मागील वीस वर्षांपासून डांबरींपासून वंचित आहे. आपणांस या 23 गावांच्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांपुर्वी आपण या रस्त्याच्या कामास मंजुरी देवून 20 वर्षानंतर या रस्त्याला व येथील शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थांना  मुक्ती दयावी या आशयाचे  निवेदन अॅड. राकेष पाटील यांनी दिले…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments