Thursday, November 21, 2024
Homeअपघातअटल सेतूवर आला...गाडीतून उतरला...थेट उडी मारली...बँकेच्या डेप्युटी मॅनेजरने उचलले टोकाचे पाऊल... 

अटल सेतूवर आला…गाडीतून उतरला…थेट उडी मारली…बँकेच्या डेप्युटी मॅनेजरने उचलले टोकाचे पाऊल… 

 नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहार):-

देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बरलिंकवरुन ( अटल सागरी सेतू ) पुन्हा एकदा एकाने उडी मारली आहे. यापूर्वी देखील या सागरी सेतूवरुन अनेकांनी उडी मारुन जीव दिला आहे. एका 56 वर्षांच्या महिलेला ड्रायव्हरच्या सर्तकतेमुळे पोलिसांच्या तत्परतेने वाचविण्यास यश देखील आले आहे… अटल सेतूवर मोटरगाडी थांबवून एका व्यक्तीने उडी मारल्याचा प्रकार सोमवारी घडला…याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शिवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहिम राबवली. त्या व्यक्तीचा अद्याप शोध सुरू असून त्याच्या कुटुंबियांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.सोमवारी सकाळी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी प्राप्त झाला होता. त्यात एका व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारल्याचे पोलिसांना समजले. शिवडी पोलीस ठाणे हद्दीतील अटल सेतूवरून एका व्यक्तीने समुद्रात उडी टाकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत, दिवस पाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक सावर्डेकर, ठाणे अमलदार महिला पोलीस उपनिरीक्षक साकोरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.घटनास्थळी उडी मारणाऱ्या इसमाची लाल रंगाची मोटारगाडी (ब्रेझा) क्र. MH01DT9188 उभी होती. ती मोटरगाडी सुशांत चक्रवर्ती यांची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. शिवडी पोलिसांच्या हद्दीत अटलसेतूवर ८.५ किमी अंतरावर व्यक्तीने मोटरगाडी थांबवली व त्यानंतर त्याने उडी मारली…अटल सेतू नियंत्रण कक्ष येथील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली असता घटना सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी घडल्याचे दिसते. घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले. त्या व्यक्तीचा स्पीड बोटीच्या साहाय्याने शोध सुरू आहे…संबंधीत व्यक्तीच्या कुटुंबियांची माहिती घेऊन त्यांना याबाबत कळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले…           अटल सेतुवर याआधी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. जुलै महिन्यात आर्थिक समस्येला कंटाळून एका 38 वर्षी अभियंता श्रीनिवास यांनी अटल सेतूवरुन उडी मारून जीव दिला होता. त्याचाही मृतदेह त्यावेळी सापडला नव्हता. तर मार्च महिन्यात ठाणे जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरने अटल सेतूवरुन उडी मारल्याने तिचा मृत्यू झाला होता. तिचाही मृतदेह सापडला नव्हता. तर एका 56 वर्षांच्या महिलेने देखील अटल सेतूवरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतू ड्रायव्हर आणि पोलीसांच्या तत्परतेमुळे तिला वाचविण्यात यश आले होते.हा पुल इंजिनिअरिंग मार्व्हल म्हणून ओळखला जातो. हा पूल सध्या श्रीमंताचे जीवन संपवण्याचे ठिकाण म्हणून कुप्रसिद्ध झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments