रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता पाच तोतया इन्कम टॅक्स अधिकारी हे एका व्यापारी शौकत अन्सारी यांच्या दुकानात गेले व आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर आहे…असे सांगून आम्हाला तुमच्या घराचा सर्च करायचा आहे…तर शौकत अन्सारी यांच्या घरी जाऊन त्यांना विचारू लागले व घरामध्ये शिरले… शौकत यांनी सतर्कता दाखवून त्यांना विचारले तुमचा आयडी कुठे आहे ?तर बनावट आयडी दाखवून बनावट सर्च वॉरंट दाखवून त्यांने शौकत यांना घाबरवले…शौकत याने सतर्कता दाखवून लगेचच रोहा पोलीस स्टेशनला कॉल केला…व काही बनावट माणसे घरी आल्याची तात्काळ माहिती दिली…घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले…व त्या आरोपींना ताब्यात घेतले…पाच आरोपींपैकी तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे…तर दोघेजण फरार असून त्यांचा शोध रोहा पोलीस घेत आहेत…त्यांच्याकडे असलेले बनावट आधारकार्ड,बनावट इन्कम टॅक्स ,आयडी कार्ड ,बनावट सर्च वारंट सापडले आहे…सदर आरोपी मुंबईचे असून शौकत आणि आजूबाजूच्या लोकांच्या सतर्कतेमुळे मोठा प्रसंग टळल्याचे बोलले जात आहे…या घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस करीत आहेत…