महाडमध्ये आदिवासी समाज मंदिराची भिंत कोसळली…भिंत कोसळल्याने झोपलेले 3 आदिवासी जखमी…

0
64

शिवसत्ता टाइम्स धम्मशिल सावंत रायगड

रायगडच्या महाडमध्ये एका आदिवासी समाज मंदिराची भिंत कोसळून या घटनेत तीन आदिवासी जखमी होण्याची घटना घडली आहे. महाड तालुक्यातील शेल्टोली गावात घडलेल्या या घटनेत दोन महिला व एक बालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत.मोलमजुरी करण्यासाठी भोसरी,पुणे येथील परिसरातून आलेले आदिवासी समाजातील शेंद्रे राजपूत कुटुंब मोलमजुरी करून शेल्टोली येथील आदिवासी समाज मंदिरात काही दिवसांपासून वास्तव्यास होते.मात्र आज अचानक कोसळलेल्या या भिंतीच्या दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत.
यापैकी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे येणेप्रमाणे …जुबी राजपूत – वय 20 वर्ष,गुजारी राजपूत – वय 19 वर्ष,भाग्या राजपूत – वय 5 वर्ष