रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रायगडच्या रोहा येथील कुंडलिका नदीवरील शिवसृष्टी परिसरात छ शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. छ शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा 25 फुटी पुतळा अतिशय रेखीव असून पुण्यातील कला संस्कार स्टुडिओचे ख्यातनाम शिल्पकार महेंद्र थोपटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा भव्य पुतळा साकारला आहे.पुतळ्याची उंची 25 फूट आहे…तर पुतळ्याची एकूण उंची 50 फूट आहे. ब्राँझ या धातूपासून घडविलेला हा पुतळा 8. 5 टन इतका वजनाचा आहे. खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यास छत्रपती घराण्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि युवराज संभाजी राजेंची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमास हजारो शिवप्रेमींची उपस्थिती लाभणार आहे.