Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडउरण तालुक्यातील शेतकरी प्रकाश ठाकूर यांना सपत्नीक वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्काराने...

उरण तालुक्यातील शेतकरी प्रकाश ठाकूर यांना सपत्नीक वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित…

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):- 

               सामाजिक, शैक्षणिक, कामगार क्षेत्रात तसेच भाजीपाला – फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे उरण तालुक्यातील नागाव गावातील शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश ठाकूर यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून देण्यात येणारा महत्त्वाचा वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार २९ सप्टेंबर २०२४ रोजी वरळी मुंबई येथील एन.एस.सी.आय.चा सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडियम मध्ये महाराष्ट्र शासनाचा भव्य सत्कार व पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री.सि.पी. राधाकृष्ण याचां  शुभहस्ते वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करताना शासनाकडुन सन्मानचिन्ह ,शाल,पत्नीला साडी व इटर भेटवस्तु देऊन  सपत्नीक  सन्मानित करण्यात आले.
सदर सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,कृषी मंत्री धनंजय मुंडे,राज्याचे कृषी सचिव जयश्री भोज.कृषी आयुक्त रविंद्र भिनवडे  याच  प्रमुख उपस्थितीत, तसेच  सर्व कृषी अधिकारी ,दोन हजार निमंत्रित शेतीनिष्ठ शेतकरी याचा उपस्थितीत सोहळा पार पडला.
उरण तालुक्यातील नागाव गावचे माजी सरपंच तथा शासनानी गौरविले शेतीनिष्ठ शेतकरी शांताराम का.ठाकूर यांच्या घरात प्रकाश ठाकूर यांचा जन्म झाला असून त्यांनी आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वडिलोपार्जित कृषी ( शेती ) क्षेत्र लहान पणापासून ते वयाच्या ७१ व्या वर्षीही सांभाळण्याचे काम केले आहे.त्यानी सामाजिक, शैक्षणिक, कामगार क्षेत्राबरोबर ही आधुनिक पध्दतीच्या भात शेतीत बागायती भाजीपाला, फलोत्पादन क्षेत्रात ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्याची दखल विवीध सामाजिक संस्थांनी,तालुका कृषी, जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य शासनाने या अगोदर घेऊन विविध पुरस्कार तसेच आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.प्रकाश ठाकूर यांनी आपल्या उतरत्या वयात ही उरण तालुक्यातील अनेक तरुणांना आधुनिक पध्दतीच्या भात शेतीची तसेच शासनाच्या ठिंबक, विविध योजनांची माहिती करुन देण्याचे काम केले आहे. कृषी क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीची दखल शासनाने घेऊन शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश ठाकूर यांना महाराष्ट्र राज्याचा महत्वाचा समजला जाणारा वसंतराव नाईक कृषी भूषण  पुरस्काराने सन्मानितकरण्यातआलेचे समाजताच विविध पक्षांचे पदाधिकारी,आजी माजी सरपंच, उद्योगपती, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी,रायगड,ठाणे, रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments