शेकापमधील वाद पुन्‍हा एकदा चव्‍हाटयावर…शेकापच्या घरातील महिला नेत्यांनाच आमंत्रण नाही…

0
89

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :- 

शेतकरी कामगार पक्षात पाटील कुटुंबियांतील पेझारी विरूदध अलिबाग हा वाद आता लपून राहिलेला नाही. त्‍याची प्रचिती सध्‍या येत आहे…रायगड जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या महिला बचत गट फेडरेशन आयोजीत महिला संवाद मेळावा आज पेझारी इथे पार पडला…यानिमित्‍ताने शेकापमधील विसंवाद थेटपणे समोर आलेत…या मेळाव्‍यांचे नेतृत्‍व शेकापचे सर्वेसर्वा जयंत पाटील यांच्‍या सुनबाई चित्रलेखा पाटील या करताहेत…मेळाव्‍याला उपसथित महिलांना साडीवाटपही करण्‍यात आले. मात्र या मेळाव्‍याला माजी आमदार पंडित पाटील यांच्‍या पत्‍नी भावना पाटील यांच्‍यासह पाटील कुटुंबियातील महिला उपस्थित नव्‍हत्‍या आपल्‍याला या कार्यक्रमाला आमंत्रित केले नव्‍हते असा दावा जिल्‍हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी केलाय. तर आमच्‍या कुटुंबातील तिघींना न बोलावल्‍याने आमच्‍या तीन साडया कमी झाल्‍या असा टोला पंडित पाटील यांचे पुत्र सवाई पाटील यांनी लगावला आहे