गुहागर शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील ) :-
गुहागर आगारात तीन शिवशाही आणि शिवनेरी बस देण्यात येणार आहेत…मात्र त्या जुन्या देण्यात येणार आहेत…जर गुहागर आगाराला जुन्या शिवशाही गाड्या देण्यात आल्या तर प्रवाशी संघटनेकडून त्याला विरोध केला जाईल असा इशारा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आणि बळीराज सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी प्रशासनाला दिला आहे…गुहागर आगारात लालपरी गाड्या कमी असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे…गुहागर आगारात २९ लालपरी आहेत… त्या नवीन मिळाव्यात…शिवशाही गाड्या जुन्या माथी मारण्यात येत असतील तर गुहागर आगाराचे नुकसान आहे…त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष घालावे अशी मागणी प्रवाशी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे…
गुहागर आगारातील सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या गाड्या जाणूनबुजून बंद करण्यात आल्या आहेत…याच बरोबर ग्रामीण भागात गाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशी वर्गाचे, शाळा ,विद्यार्थी यांचे खूप नुकसान होत आहे…गुहागर आगाराच्या माथ्यावर जुन्या गाड्या मारू नयेत असा इशारा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बळीराज सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पराग कांबले यानी दिला आहे…