पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदिप मोकल):-
टाटा स्टील फाऊंडेशन खोपोली पुरस्कृत खालापुर तालुका कबड्डी असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कबड्डी पंचाचे प्रशिक्षण शिबिर खोपोली येथील महाराजा मंगल सभागृहात घेण्यात आले… यावेळी चित्राताई पाटील यांनी सांगितले की, रायगड जिल्हातील पुरूष कबड्डी पंच चांगली कामगीरी करत आहेत… अशा शिबीरातून त्यांना उच्चस्तरीय काम करण्यासाठी बळ मिळेल… त्यांच्या पावलावर पाऊल टाकून महिला पंचही सक्षम झाल्या आहेत… आणि मी स्वतः रायगड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील महिला संघाना भेटी देऊन संघाची सराव शिबीरे घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून संघ बलाढ्य होण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करीन…
रायगडमध्ये प्रथमच संगणकाच्या सहाय्याने पडद्यावर प्रोजेक्टद्वारे प्रत्यक्ष खेळलेल्या सामन्यांचे चलचित्र दाखवून शंकांचे निरसन केले… यावेळी पंचानी स्वतःच्या संघाला शिस्त लावा, रायगड मधील पंच सक्षम झाले पाहीजेत बीच कबड्डीकडे लक्ष द्या असे आस्वाद पाटील यांनी यावेळी सांगितले… या शिबिरात महाराष्ट्रचे पंच मंडळाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच विश्वास मोरे, आंतराष्ट्रीय पंच रविंद्र म्हात्रे यांनी दिवसभराच्या सत्रामध्ये पंचाना उत्कृष्ठ मार्गदर्शन करून सर्व पंचांच्या शंकाचे निरसन करून पंचाचे समाधान केले… रायगड जिल्हा पंच मंडळाचे अध्यक्ष शरद कदम यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, यापुढे रायगड मध्ये योग्य पध्दतीने कार्यभार करून कोणत्याही पंचावर अन्याय होणार नाही, याची दखल घेतली जाईल… पंचांचा दर्जा उंचाविण्यासाठी पंचांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल… पंचांनी आपला दर्जा सुधारण्यासाठी नियम, शिस्त, मनोभावना अंगीकृत करण्याकरीता प्रयत्न करावे, रायगडचा पंच राज्यात, देशात उत्तम पंच म्हणून ओळखला जाईल याकरीता पंच मंडळ व कबड्डी असोसिएशन प्रयत्नशील राहील… यावेळी रायगड जिल्हा कबड्डी असो.चे सरकार्यवाह जे.जे.पाटील यांनीही पंचानी उत्तम कामगीरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या व थोडक्यात मार्गदर्शन केले… या शिबीरात टाटा स्टील फाऊंडेशन खोपोली आणि महाराजा मंगल कार्यालयाचे मालक विक्रम यशवंत शेठ साबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले… या शिबीरात पुरुष व महिला असे एकूण ८० पंच सहभागी झाले होते… यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह आस्वाद पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह चित्राताई पाटील, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंच मंडळाचे प्रमुख विश्र्वास मोरे, पंच मंडळाचे सचिव दत्ता झिझुर्डे, सदस्य सुर्यकांत देसाई, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षा शिवानी जंगम, टाटा फाऊडेशनचे उदय गांवड, रायगड जिल्हा क्रिडा अधिकारी मनिषा मानकर, विक्रम सांबळे, रायगड जिल्हा कबड्डी पंच प्रमुख शरद कदम, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह जे.जे.पाटील, हिरांचद पाटील, गजानन मोकल, रंविद्र म्हात्रे, सुर्यकांत ठाकुर, जनार्दन पाटील, पांडूरंग पाटील, जगदीश पाटील, नरेश म्हात्रे, प्रथमेश पाटील, नरेश म्हात्रे, अंजिक्य पाटील, आतंराष्ट्रीय पंच रविंद्र म्हात्रे, अमित जगताप, हिरामण भोईर आदिंसह रायगड जिल्हा कबड्डी असोसिएनचे पदाधिकारी कबड्डी पंच उपस्थित होते..