जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बसला भीषण आग… आगीत बस जळून खाक… आगीचे कारण अस्पष्ट…

0
79

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):- 

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर खाजगी बसला अचानक आग लागली. ही घटना संध्याकाळी सातच्या सुमारास घडलेली आहे. सुदैवाने बसमधील ३३ प्रवासी बचावले आहेत. त्यांना तातडीने बसच्या खाली उतरविण्यात आले. आय.आर.बी आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे…परंतु, आगीत बस जळून खाक झाली आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.बंगळुरूवरून जयपूरकडे जात असलेल्या खाजगी बसला अचानक आग लागली. सुदैवाने बसमधील चालक आणि क्लीनरसह ३३ जण सुखरूप बाहेर पडले. ही घटना सातच्या सुमारास महामार्गावरील वाघजाई मंदिराकडून खाली उताराला लागल्यानंतर घडली. घटनास्थळी तातडीने आय.आर.बी आणि अग्निशमन दल पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. परंतु, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. या आगीत बस व बसमधील प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे…या घटनेमुळे जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या…
या अपघाताची माहिती मिळताच  महामार्ग पोलीस, अग्निशमन दल, डेल्टा फोर्स आय आर बी पेट्रोलियम  आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या संस्था घटनास्थळी  पोहचून काही वेळात आग आटोक्यात आणून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले…