महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड शहरातील काजळपुरा आणि सरेकर आळी या मध्यभागी रात्री आठ वाजता तीन चोरांनी तांब्याच्या टाकीची चोरी करून पळ काढण्याचा प्रयत्न केला…यावेळी बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष दीपेश जाधव व पवन उमासरे यांच्या हे तिन्ही चोर निदर्शनास आले…या चोरांचा पाठलाग करून चोरांना रांगेहाथ पकडले व महाड शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे…याचा अधिक तपास महाड शहर पोलीस करीत आहे…यावेळी बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष दीपेश जाधव व पवण उमासरे यांनी फेरीवाले महाड शहरात दारोदारी येत आहेत तर कृपया नागरिकांनी चोरांपासून सतर्क राहावे असे आव्हान केले आहे…