Thursday, November 21, 2024
Homeक्राईम न्यूजचहा टपरीवर चहाच्याआडून अंमली पदार्थांची विक्री... सराईत गुन्हेगाराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली...

चहा टपरीवर चहाच्याआडून अंमली पदार्थांची विक्री… सराईत गुन्हेगाराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली अटक…

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ):-

उरण -पनवेल महामार्गालगत जासई येथील सुरुंगपाडा येथे चहाची टपरी चालवण्याबरोबरच अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. राजन बाळा राठोड (३२) असे त्याचे नाव असून अमली पदार्थविरोधी पथकाने चहाच्या टपरीतून २१ ग्रॅम हेरॉइन व एक किलो गांजा, तसेच चिलीम, रिजला पेपर, गोगो, सिल्वर फॉइल पेपर असा सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मुंबईतील गोवंडी येथे राहणारा एक सराईत गुन्हेगार उरण-पनवेल महामार्गालगत एका पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये हेरॉइन व गांजा यांसारख्या अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती.त्यानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत नायडू, नीलेश धुमाळ, पोलिस हवालदार तायडे, गणेश पवार, पोलिस कॉन्स्टेबल चालक सोनकूळ आदींच्या पथकाने गुरुवारी (ता. ३) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जासई सुरुंगपाडा येथील चहाच्या टपरीवर छापा मारला.

यावेळी चहाच्या टपरीमध्ये २१ ग्रॅम हेरॉइन व एक किलो गांजा तसेच चिलीम, रिजला पेपर, गोगो, सिल्वर फॉइल पेपर असा सहा लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ व इतर वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपी राजन बाळा राठोड याच्याविरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments