Thursday, November 21, 2024
Homeक्राईम न्यूजमुंबई हादरली...पिण्याच्या पाण्याने केला तरुणीचा घात...पाण्यातून गुंगीचे औषध टाकून तरुणीवर सामूहिक अत्याचार...

मुंबई हादरली…पिण्याच्या पाण्याने केला तरुणीचा घात…पाण्यातून गुंगीचे औषध टाकून तरुणीवर सामूहिक अत्याचार…

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-

पाण्यातून  गुंगीचे औषध टाकून 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना  वांद्रेच्या निर्मलनगर परिसरात घडली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे मुंबईत  नेमकं चाललंय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,पीडित तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अत्यचार करण्यात आले आहे. घरी सोडतो असे म्हटल्यानंतर पीडीत  तरूणी तरुणांसोबत गेली.  लिफ्ट दिल्यानंतर तरुणांनी तरुणीला पिण्यासाठी पाणी दिले. मात्र याच पिण्याच्या पाण्याने घात केला.  कारण  पाण्यात गुंगीच औषध टाकले.  त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर अज्ञातस्थळी आळीपाळीने  बलात्कार केला.पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आले. यावेळी आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. घरी सोडल्यानंतर तरूणीने तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली. यात या तरुणीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक तर दुसरा आरोपी फरार आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments