आई एकविरेच्या दर्शनासाठी जात असताना अपघात…शेमडी गावाजवळ ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली…

0
113

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

                   पाली खोपोली राज्य महामार्गावर रविवारी दि. 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी कारचा विचित्र अपघात झाला. पालीहून कार्ला येथे आई एकविरेच्या दर्शनासाठी जात असताना, शेमडी गावाजवळ ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला जाऊन झाडावर आदळून अपघात झालाय. झाडाला आदळून ही कार रस्त्याच्या बाजूला आकाशाकडे तोंड करून उभी होती…कारमधील पाचजण तरुण थोडक्यात बचावले…
      याबाबत सविस्तर माहिती अशी की ,वळणावर कार नियंत्रणाबाहेर जाऊन थेट रस्त्याच्या बाजूच्या झाडावर आदळून उलटली, ज्यामुळे गाडीच्या पुढील भागाचे दृश्य खिळवून ठेवणारे होते. कारची पुढील बाजू व चाके आकाशाकडे उंचावलेली होती. कारमध्ये प्रवास करणारे पाच तरुण अक्षरशः मृत्यूच्या दारातून परतले…सुदैवाने यात  कोणतीही जीवितहानी झाली नाही…मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे..या अपघातानंतर, प्रवासी आणि स्थानिकांनी अपघातग्रस्तांना कारमधून बाहेर काढले… सायंकाळी उशिरापर्यंत कार बाहेर काढण्याचे काम सुरू होते.