म्हसळा शिवसत्ता टाइम्स (गणेश म्हाप्रळकर):-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या टोल माफीची घोषणा केली…यामुळे छोट्या-मोठ्या वाहनांच्या टोल माफीनंतर नागरिकांकडून या गोष्टीच कौतुक करण्यात आले. मुंबई-पुणे या जुन्या महामार्गावर असणाऱ्या खालापूर येथील शेंडुल टोलमाफीचा देखील प्रवाशांना फायदा व्हावा यासाठी हे टोल बंद करण्यात यावा…या मागणीसाठी रायगड जिल्ह्याचे मनसेचे जिल्हा संघटक किरण गुरव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज मनसे सैनिकांसमवेत भेटून याबाबत पत्र देऊन टोल बंद करण्याची विनंती केली…