भरत शेठ गोगावले यांच्याकडून नडगाव ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहण… मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते महाडमध्ये आधार संच वितरण…

0
3

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-

आधार कार्ड हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सध्या स्थितीत आधार कार्ड शिवाय कोणतेही काम होत नाही. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हा द्यावाच लागत आहे. शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात नागरिकांची सोय व्हावी म्हणून आधार संच वाटप केले जातात रायगड जिल्ह्यासाठी 2012 ला आदर संच वाटप झाले होते मात्र आता याला 15 ते 17 वर्षे झाली असून हे आधार संच कुचकामी ठरत असताना शासनाने पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील सद्यस्थितीत कार्यान्वित असणाऱ्या 74 आधार केंद्रांपैकी 71 केंद्रांना नवीन आधार संच दिले आहेत या आधार संचालन पैकी 32  आधार संचाचे वाटप  राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधत वितरित करण्यात आले आज महाड मधील संत शिरोमणी रोहिदास महाराज नगर पालिका सभागृहात करण्यात आले. यावेळी पनवेल खालापूर, कर्जत माणगाव महाड पोलादपूर इत्यादी तालुक्यातून आधार केंद्र चालवणाऱ्या केंद्र चालकांनी आपले आधार संच मंत्री भरत शेठ यांच्या हस्ते घेतले असून यावेळी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे, महाडचे तहसीलदार महेश शितोळे, शिवसेना दक्षिण रायगड समन्वयक राजेश देशमुख, शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, संपर्कप्रमुख सिद्धेश पाटेकर, महानगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील अग्रवाल, माजी नगरसेवक प्रमोद महाडिक, इत्यादी मान्यवर आणि आधार संच धारक इत्यादी उपस्थित होते.