उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या मुद्रांक शुल्कवाढीनंतर आता १००, २०० नाहीतर ५०० रूपये स्टॅम्प पेपरसाठी मोजावे लागणार आहेत. खरेदी खत, हक्क सोडपत्रासाठी आता ५०० रूपये मुंद्राक शुल्क मोजावं लागणार आहे. दस्त नोंदणीसाठी यापूर्वी किमान १०० रूपये मुंद्राक शुल्क मोजावे लागत होते. मात्र त्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे १०० रूपयांहून अधिक दर आकारला जाणार आहे. उदाहरणार्थ सदनिकांच्या विक्री व्यवहार नोंदणीसाठी १०० रूपये मुंद्राक शुल्क आकारण्यात येत होते. ते आता ५०० रूपये करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. जवळपास १२ प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी १०० ते २०० रूपये मुंद्राक आकारण्यात येत होते. मात्र आता त्यासाठी किमान ५०० रूपये दर आकारण्याचे ठरविण्यात आले आहे…