सेझ प्रकल्पग्रस्त विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकणार…उरण,पेण,पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा…

0
127

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर ) :-

महामुंबई सेझसाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनी लवकरात लवकर परत करा, अन्यथा आगामी विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सेझ विरोधी संघर्ष समितीने दिला आहे. सेझसाठी घेतलेल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी उरण, पेण, पनवेल परिसरातील शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले आहे.मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रायगड जिल्हाधिकारी यांना येत्या चार आठवड्यांमध्ये सदर प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यावर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी अजूनही निर्णय दिलेला नाही.