चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-
मुख्यमंत्री माझी शाळा अभियान अंतर्गत खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव यांनी रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक येण्याचा तर मुंबई विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे… मुख्याध्यापक सुभाष राठोड आणि शिक्षक यांचे अभिनंदन होत आहे…
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात खालापूर तालुक्यातील वडगाव शाळेने विविध उपक्रम राबविले, यात प्रत्येक मुल आनंददायी, पिण्याचे स्वच्छ पाणी, सर्व वर्गात विद्युत पुरवठा,पंखे, डिजीटल रूम, पट संख्या वाढविणे, इंग्रजी माध्यमांत शिकणारी मुले पुन्हा वडगाव शाळेत, गैर हजर त्याची दारी शाळा, सर्व शाळा रंगीत, ओला कचरा, सुका कचरा यांचे वर्गवारी आणि कंपोस्ट खत निर्मिती, गांडूळ खताची निर्मिती, पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लागवड आणि संगोपन, मतदान जनजागृती, संगणक लॅब, शासनाचे उपक्रम राबविणे, स्वागत कमानी, असे अनेक उपक्रम राबविले आहेत…मुख्याध्यापक सुभाष राठोड, सर्व शिक्षक, शाळा समिती, ग्रामस्थ, विवीध माध्यमे, जिल्हा शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी संदीप कराड, गट शिक्षण अधिकारी चोरमोळे यांनी विशेष परिश्रम घेतले…
मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दिपक केसरकर, शिक्षण सचिव कुंदन मॅडम, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे व मान्यवरांच्या उपस्थित सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले…यावेळी शिक्षणाधिकारी श्रीम.पुनीता गुरव, शिक्षणाधिकारी तुपे, गट शिक्षण अधिकारी कैलास चोरामले, शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा दास, सरपंच गौरी गडगे, महादेव गडगे, शिक्षण समिती अध्यक्ष करुणा ठोंबरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी कार्यक्रमास मुम्बई येथे उपस्थित होते…
माझे स्वप्न शाळा आंतरराष्ट्रीय करणे व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण सहज व सुलभ उपलब्ध होईल असे काम सर्वांच्या सहकार्याने करायचे आहे असे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी सांगितले.