खालापूर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
खालापूर तालुक्यात २०२२/२०२४ पासून निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी उत्खनन व भराव तसेच दाखल्यांसह अनेक कामात गैरकारभार केला असल्याचा गंभीर आरोप युनायटेड जर्नालिस्ट फोरमचे रायगड जिल्हाध्यक्ष पत्रकार सुधीर माने यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे…निवासी नायब तहसिलदार राठोड यांच्याविरोधात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत्या…कर्जत-खालापूर तालुक्यात शून्य मात्र रॉयल्टी जमा करून उद्योजक, कंपनी, श्रीमंत व्यावसायिकांना रॉयल्टीसाठी मुभा देण्यात आली आहे…याबाबत तक्रार करून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. यांचे तलाठी, मंडल अधिकारी रॉयल्टी घेण्याआधी उत्खनन व भराव करणाऱ्या ठिकाणी जागेवर जावून पंचनामा करतात…त्यानंतर त्यांना परवानगी व रॉयल्टी भरणा करण्यासाठी सांगितले जाते, पण या लोकांकडून नाममात्र रॉयल्टी घेतली जाते…गोरगरीब शेतकऱ्यांचे क्षेत्र दुरुस्त करणे,रस्ते आदी महसूली अर्धन्यायिक प्रकरणात पैसे घेऊन निर्णय देणे,हेकेखोरपणा करून सामान्य जनतेची प्रशासकीय हेळसांड करणे,राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाने प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करून कामे करणे, माहिती अधिकाराच्या सुनावणी दरम्यान वेळेचा भंग करून एकतर्फी निकाल देऊन अरेरावी करून अपमानित करणे आदी गंभीर विषयांवर राठोड यांच्यावर सुधीर माने यांनी आरोप केले असून राठोड यांची विभागीय चौकशी करून कायदेशीर कार्रवाई होण्यासाठी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी यांना युनायटेड जर्नालिस्ट फोरमचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा साप्ताहिक खालापूर वार्ताचे मुख्य संपादक पत्रकार सुधीर गोविंद माने यांनी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे…