तळोजा शिवसत्ता टाइम्स (वृषाली शिंदे):-
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे…अशातच उरण तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली… शिवसेना नेते, दिवंगत मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली 2008 साली उरणमध्ये सेझ विरोधात आंदोलन झाले होते…त्या आंदोलनात माजी आमदार मनोहर भोईर सहभागी झाले होते… त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी या प्रकरणात आज मनोहर भोईर यांना ऐन निवडणुकीच्या काळात अटक करण्यात आली…काल या केसची सुनावणी होती…ती सुनावणी झाली नाही…सुनावणी आधीच नवी मुंबई पोलिसांनी मनोहर भोईर यांना अटक केली…शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तमाम शिवसैनिकांच्या प्रयत्नाने उरणचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांची तळोजा कारागृहातून नुकतीच सुटका झाली…यावेळी कारागृहाबाहेर रायगड जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत,दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगने,पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल,महानगर समन्वयक दीपक घरत,अवचित राऊत आदींसह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते…याबाबत शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनेलशी बोलताना ते म्हणाले …