निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज…गैरप्रकारांवर पोलिसांची करडी नजर…

0
83

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सर्व ठिकाणी हालचालींवर करडी नजर असुन कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून रायगड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीस ॲक्शन मोडवर दिसुन येत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार संदीप पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार प्रवासी वाहतुक करणा-या रिक्षातुन अवैधरित्या दारुची वाहतुक करताना आढळल्याने पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन रिक्षांसह तीनशे लीटर देशी व विदेशी दारुच्या बाटल्या असा एकूण ३ लाख ६०८ रुपयांचा मुददेमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे…सुरेश बाळकृष्ण गायकर (वय ६६, रा. आळी अंबीवली मोहोपाडा ता. खालापुर) हा एम.एच.४६ झेड ४२४६ व महेंद्र शंकर जाधव (वय ४५,रा.चांभार्ली ता. खालापुर) हा एम.एच. ४६ ए. झेड. ४८२५ क्रमांकाच्या रिक्षातून सोमवार दि. २२ आक्टोबरला रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना दारुची वाहतूक करताना आढळले.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे संदीप वसंत पाटील यांनी रसायनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दोघांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला.अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, सहाय्यक फौजदार राजेश पाटील,संदीप पाटील,पोलीस हवालदार यशवंत झेमसे,सुधीर मोरे,रवींद्र मुंडे,राकेश म्हात्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.अधिक तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश पवार हे करीत आहेत…