नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार पवारवाडी पोलिसांनी वाहन चोरीच्या टोळीवर मोठी कुरघोडी केली.पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या पथकाने संवादगाव फाटा परिसरात सापळा रचून मुख्य आरोपी शहजाद सैय्यद इकबाल,शेख युसुफ शेख अयूब यांना अटक चौकशीत या दोघांनी आणखी तीन साथीदार शेख नाझिम अब्दुल हमीद,प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण आणि देविदास नानाजी वाध यांच्यासह मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यातून ३० दुचाक्या व १ ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली.
जप्त वाहनांमध्ये हिरो होंडा शाइन,युनिकॉर्नसह विविध कंपनींच्या दुचाक्यांचा समावेश आहे.सर्व वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे…

