मोहोपाडा नवीन पोसरी येथील नवतरुण भजनी मंडळाला मिळाली पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजनाची संधी…

0
111

रसायनी आनंद पवार (वार्ताहर ) :-
नवीन पोसरी मोहोपाडा येथील गुरुवर्य ह.भ.प. काशिनाथ महाराज लबडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच मोहोपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. वसंतशेठ पाटील यांच्या सहकार्याने नवतरुण भजन मंडळ नविन पोसरीने आयोजित केलेल्या पंढरपूर येथील यात्रा उत्सवा दरम्यान रविवार दि.२०ऑक्टोंबर ते२१ऑक्टोंबर२४ रोजी मोठ्या भक्तीमय उत्साही व आनंदमय वातावरणात पार पडल्याने वारकरी सांप्रदायसह नवीन पोसरी मोहोपाडा येथील नवतरुण मित्रमंडळाचे पदाधिकाऱ्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.पंढरपूर येथे दिनांक२१ऑक्टोंबर रोजी नवीन पोसरी मोहोपाडा येथील वारकरी मंडळींना पंढरपूरच्या पवित्र अशा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रायगड जिल्हा खालापूर तालुक्यातील नवीन पोसरी येथील नवतरुण भजनी मंडळाला सुवर्णसंधी प्राप्त झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे‌