अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकरसह अमुलकुमार जैन) :-
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सांगवी येथे बनावट गोल्ड फ्लेक सिगारेटचा कारखाना पोलिसांनी शोधून काढला आहे…अब्बास नामक इसमाच्या फॉर्म हाऊसवर रायगड पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत पाच कोटींच्या आसपास मुद्देमाल जप्त करीत पंधरा आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली…यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे उपस्थित होते…
रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांगवी परिसरात मुंबई येथील अब्बास नामक इसमाचा फॉर्म हाऊस आहे.या फॉर्म हाऊसमध्ये गोल्ड फ्लेक या प्रसिद्ध ब्रॅण्डची बनावट सिगारेट बनविली जायची… याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळताच त्यांनी त्वरित सदरची माहीती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे रायगड यांना दिली…त्यानंतर रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी एक पथक तयार केले… या पथकाने कर्जत तालुक्यातील सांगवी गावच्या नदीच्या कडेला असणाऱ्या अलिशान फार्म हाऊसला टार्गेट केले… या फार्म हाऊसला भक्कम तटबंदी व उंच संरक्षक भिंत आहे.भिंतीला मोठे दरवाजे असून कारवाईच्यावेळी हे दरवाजे आतून बंद होते…त्यामुळे पथकापैकी काही कर्मचारी यांनी पाठीमागील नदीच्या बाजूला असलेल्या संरक्षित भिंतीवरून फॉर्म हाऊसमध्ये प्रवेश केला… पोलीसांना पाहुन आतील एका कामगाराने दरवाजा उघडला…त्यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक सरगर सहा पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहा फौ राजेश पाटील, पोलिस हवालदार झेमसे, मोरे, सावंत,म्हात्रे, मुंढे यांनी आतमध्ये जावुन पाहणी केली असता…एका मोठया गाळयामध्ये गोल्ड फ्लेक या प्रसिद्ध ब्रॅण्डची बनावट सिगारेट बनविली जात होती… मोठ-मोठ्या मशिनवर १५ कामगार काम करत होते… कारखान्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर सिगारेट निर्मिती करण्याकरीता लागणारी प्रोसेस केलेली मिश्रीत सुंगधीत तंबाखू आढळून आली. सिगारेट बनविण्याकरीता लागणारा कागद, पॅकींग करण्याकरीता लागणारे बॉक्स, सिगारेट पॅक करण्याकरीता लागणारे पॅकेट व इतर सर्व संबंधित साहित्य तसेच सिगारेट तयार करणा-या मोठमोठ्या सेमी अॅटोमॅटिक ३ मशीन दिसून आल्या…
यावेळी कामगारांकडे सिगारेट निर्मितीबाबत आवश्यक परवान्यांची पोलिसांनी विचारणा केली असता कोणतेही परवाने आढळून आले नाहीत… त्यामुळे सदर कारखाना बनावट असल्याचे निष्पन्न झाले… पोलीस पथकाने ही माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिली…त्याबरोबर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी भेट दिली व कारवाईबाबत सूचना दिल्या… नंतर पंचनामा करून तयार केलेल्या सिगारेटचा माल, सिगारेटला बनविण्याकरीता लागणारे मटेरियल, लागणारे साहीत्ये याचे मोजमाप करण्यात आले … त्यावेळी २,३१,६०,०००/- रू किंमतीच्या तयार केलेल्या सिगारेट, १५,८१,९००/- रू किंमतीचे सिगारेट करण्याकरीता लागणारे मटेरियल,२,४७,०००००/- रू किंमतीचे सिगारेट तयार करण्याकरीता लागणा-या मशिनरी असा एकूण ४,९४,४६,९६०/- रू किंमतीचा मुद्देमाल पंचनामान्वये जागीच जप्त करण्यात आला… कर्जत पोलिस ठाण्यात बनावट कारखाना चालवणारे कुमार विश्वकर्मा (मध्यप्रदेश),कम्मारी राजेश्वर(तेलंगाणा),लेक राम सोनी (छत्तीसगड),महमद बशीर (तेलंगाणा,)नारायण सर्यनारायण (तेलंगणा),सिध्दार्थ कोल्हटकर(महाराष्ट्र),मनोहर खांडेकर (महाराष्ट्र), दुर्गाप्रसाद अनुसुरी (आंध्रप्रदेश),रवी पिथानी(आंध्रप्रदेश),युसुब शेख (महाराष्ट), कैलास कोल्हटकर(महाराष्ट), मनीकंटा लावीटी (आंध्रप्रदेश),हरिप्रसाद चाकली (तेलंगाणा),सोहेल सिंग (उत्तरप्रदेश),हरिश मोर्या (उत्तरप्रदेश) या पंधरा आरोपीविरोधात विरूध्द कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजि नं.२६७/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम १२३.३१८(२) ३९८(४).३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयात १५ आरोपीना अटक करण्यात आली आहे.
सदर अटक केलेले सर्व आरोपी हे आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, झारखंड व इतर बाहेर राज्यातील असल्याने आढुळन आले आहेत…