रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले असून निवडणुकीची धामधुम सुरू असताना राज्यात सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीदरम्यान कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस ॲक्शन मोडवर आहेत… त्यानुसार पोलिसांनी गांजा व गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई केली आहे… मोहोपाडा पंचशील नगर येथील पंकज जगदीश ठाकुर (१८) याला रसायनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पंकज ठाकूर हा गांजा विक्री करत असल्याची कानकून पोलिसांना प्राप्त झाल्याने पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली आणि ४५० ग्रॅम वजनाचा ६००० रुपये किमतीचा गांजा व अन्य वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत… .याबाबतची फिर्याद रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस हावलदार सुरेश विलास पवार यांनी दिली असून पंकज ठाकूर याच्यावर काॅ.गुन्हा र.नं.२०३/२०२४ एन. डी.पी.एस कायदा कलम८(क)२०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या कारवाईमध्ये राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्रीवर पोलिसांनी कडक कारवाई करून रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाशिवली येथील हिताशुकुमार परिंदा (३८) याच्यावर कारवाई केली आहे. राज्यात गुटखा विक्री बंदी असतानाही सर्रासपणे गुटखा विक्री करणाऱ्यांवर रसायनी पोलिसांनी कारवाई केली आहे.गोपनीय अंमलदार राहुल मोहन भडाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंकज परिंदा याच्याकडून १४४५४/किंमतीचे विमल पान मसाला गुटखा असे एकूण २४,६३९/रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्यावर रसायनी पोलीस ठाण्यात काॅ.गुन्हा र.नं. बी.एन.एस. कलम १२३,२२३,२७४,२७५, सह अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६,२६(१)२६(२)(i),२६(२)(ii)२६(२)(iv),२७(३)(d),२७(३)(d),२७(३)(e),३०(२)(a),५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे… पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जाधव,पोलीस हवालदार मंगेश लांगी, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र वळवी,गोपनीय अंमलदार राहुल भडाळे, पोलीस हवालदार सुरेश पवार,श्री.पाटील हे करीत आहेत.