रसायनी शिवसात टाइम्स (आनंद पवार):-
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पाणशील गावाजवळ लक्झरी बस शॉर्ट सर्किटमुळे जळून बेचीराख झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि.२५ रोजी रात्री१:३०च्या सुमारास घडली.सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी व जखमी नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की,भारत बेंन्स कंपनीची लक्झरी बस क्र.एम.एच.०१इम.
८१७२ मलकापूर ते विरार अशी पुणे बाजूकडून मुंबईच्या दिशेने जात असताना रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पानशील गावाजवळ आली असता डाव्या बाजूला अचानक मोठा आवाज आल्याचे लक्झरी बस चालकाचे निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ बस बाजूला घेऊन बसमधील सर्व प्रवाश्यांना बाहेर उतरवले… बसमधील सर्व प्रवासी बाहेर उतरल्यावर लक्झरी बस ने क्षणातच पेट घेतला… याआगीत बस पूर्णपणे बेचिराख झाली असून यातील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.सदर घटनेची खबर बस चालक संभाजी नामदेव नांगरे (वय५०) रा. नांगरेपाटील गल्ली, तालुका शिराळा,जिल्हा सांगली यांनी रसायनी पोलीस ठाण्यात दिल्यावर रसायनी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी आपल्या पोलीस स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेची रसायनी पोलीस ठाण्यात अकस्मात अग्नि र.नं.०५/२०२४ अशी नोंद करण्यात आली असून पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार लालासाहेब कोळेकर हे करीत आहेत….