पनवेलमधून मनसेचे योगेश चिले निवडणुकीच्या रिंगणात… श्रीवर्धन मतदारसंघातून फैझल पोपेरेंना मनसेकडून उमेदवारी जाहीर…

0
111

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

मनसेची पाचवी यादी काल जाहिर झाली…या यादीत रायगडमधून पनवेल मतदारसंघात योगेश चिले तर श्रीवर्धन मतदार संघातून मुस्लिम उमेदवार फैजल पोपेरे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळें या दोघांची लढत ही बलाढ्य उमेदवारांशी होणार आहे… पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर तर श्रीवर्धनमध्ये मंत्री आदिती तटकरे यांचे  पारडे अद्यापही जड आहे.त्यामुळे भाजप सोबत गेल्यानंतर जस सुनील तटकरे यांना मुस्लिम मतांचा मोठा फटका लोकसभेला पडला होता… तसाच फटका आदिती तटकरे यांना यंदाच्या विधानसभेला पडणार का हे सुध्दा पाहणे महत्वाचे आहे.फैजल पोपेरे या मुस्लीम उमेदवाराला संधी देऊन राज ठाकरे यांनी मुद्दाम गुगली टाकल्याचे एकंदरीत चित्र आहे…श्रीवर्धन मतदार संघात 35 हजारहून अधिक मुस्लिम वोटर आहेत… त्यामुळे भाजप विरोधात असणारे मुस्लिम वोटर कोणाच्या पारड्यात मत टाकतील हे निकालाच्या वेळीच स्पष्ट होईल..