महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने) :-
महाड शहरातील काकरतळे मोहल्ला येथील गेली अनेक वर्ष काँग्रेस सोबत असणाऱ्या मुस्लिम तरुणांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास टाकून शिवसेनेत प्रवेश केला… यावेळी प्रवेशकर्त्या मुस्लिम बांधवांचे शिवसेनेत स्वागत करीत आ. गोगावले यांना पक्षात योग्य तो मानसन्मान राखला जाईल असे सांगत आपण हिंदू व मुस्लिम बांधवांमध्ये कधी दुजाभाव केला नाही असे सांगितले… जोपर्यंत भरतशेठ आमदार आहे तोपर्यंत मुस्लिम बांधवांना घाबरण्याचे कारण नाही असे आश्वासन दिले… प्रवेश कर्त्यांमध्ये फरीद पेडेकर, वहाब संगमेश्वरी, एजाज पेडेकर, रशदान पेडेकर, नाजीम शेख, अरफात नाडकर, अदनान संगमेश्वरी, खलिल पेडेकर, मेहफूज संगमेश्वरी उमेर पुरकर, सुफीयान पुरकर, साहिल मापकर, जिशान सेवेला, कादिर कासार बिलाल पुरकरतलाह सवेल आदींचा समावेश आहे…शिवसेनेचे महाड शहर प्रमुख डॉ.चेतन सुर्वे व मुखतार तरेच्या मार्गदर्शनाखाली फैज हुर्जूक, अजहर मापकर यांच्या हा प्रवेश करण्यात आला… यावेळी फरीद पेडेकर यांची विभाग प्रमुख, अजहर मापकर शाखा प्रमुख, खलिल पेडेकर उपशाखा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली…