माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
महाविकास आघाडीतर्फे श्रीवर्धनमधून काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर निवडणूक लढवत असून सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत श्रीवर्धनमध्ये अर्ज भरणार आहेत… राजाभाऊंच्या विजयासाठी काँग्रेस कार्यकर्ते सरसावले आहेत… राजाभाऊंच्या उमेदवारीची ठिणगी श्रीवर्धनमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत पडली… श्रीवर्धनचे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले… कार्यकर्त्यांनी स्वतः निवडणुकीचा अर्ज घेतला… माणगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास सुर्वे यांच्या विशेष उपस्थितीत तसेच श्रीवर्धन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सादिक राऊत यांच्या उपस्थितीत हा लढण्याचा निर्णय झाला… श्रीवर्धन काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांनी निवडणूक अर्ज काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते तथा काँग्रेसचे स्वर्गीय माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव राजेंद्र मधूकर ठाकुर उर्फ राजाभाऊ यांच्याकडे सुपूर्द केला… हा कार्यक्रम श्रीवर्धन काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अबरार काळोखे यांच्या काँग्रेस पक्ष निवास कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी उशिरा भरगच्च उपस्थितीत संपन्न झाला… यावेळी महविकस आघाडीचे काँग्रेस पक्ष नियोजित उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांच्यासह प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे सचिव डॉ. नरेंद्र सिंह, रायगड जिल्हा काँग्रेस महिला संघटिका उपाध्यक्ष सौ. सरोज दाखीन, श्रीवर्धन तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सादिक राऊत, पदाधिकारी, माणगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास सुर्वे, पदाधिकारी, म्हसळा शहर काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष सौ. नाजिमा रिजवान मुकादम, नगरसेवक सूफियाने हलदे आदी मान्यवर उपस्थित होते… विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडणूकीत उतरला पाहिजे… यावर त्या बैठकीत जोरदार चर्चा झाली… या बैठकीतच राजाभाऊंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले… राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर अंतुले यांचा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ होता… हा मतदारसंघ राजाभाऊंच्या रूपात काँग्रेसला आपल्याकडे कायम ठेवायचा आहे… राजाभाऊ हे लोकाभिमुख नेतृत्व आहे… जिल्ह्यात त्यांचे नाव आहे… श्रीवर्धनमध्ये त्यांनी अनेक सामाजिक कामांना हातभार लावला आहे… त्यामुळे तेच योग्य उमेदवार असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे… राजाभाऊंनी कार्यकर्त्यांनी दिलेला निवडणूक अर्ज स्वीकारला त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, दोन भाऊ, अलिबाग तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते… या सभेचे आभार प्रदर्शन श्री.अबरार यांनी मानले… सभेपूर्वी भावी आमदार श्री.राजाभाऊ ठाकूर यांनी श्रीवर्धन शहरांतील सुप्रसिध्द सोमजाई मंदिरास कुटुंबासमवेत भेट देऊन आशीर्वाद घेतले…
महाविकास आघाडीतर्फे श्रीवर्धनमधून राजाभाऊ ठाकूर…सोमवारी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार …राजाभाऊंच्या विजयासाठी काँग्रेस कार्यकर्ते सरसावले…
RELATED ARTICLES