श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
स्वर्गीय मधूकर ठाकूर म्हणजे रायगडकरांचे पप्पा… तर पप्पा का बेटा कैसा है… तो पप्पा जैसा है… असे उदगार आज सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी श्रीवर्धनकरांनी राजाभाऊ ठाकूर यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यावेळी काढले… १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडुन काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार स्व.मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजेन्द्र मधुकर ठाकूर ऊर्फ राजाभाऊ यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील श्रीवर्धन यांच्या कार्यालयात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल केला… यावेळी त्यांच्यासोबत माणगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे, वकील अरुण सावंत, माजी राजीप सदस्य रवींद्र ठाकूर, उमेदवार राजा भाऊ ठाकूर यांची बहीण सौ. मनीषा पाटील उपस्थित होते… उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर राजाभाऊ ठाकूर यांनी श्रीवर्धन बाजारपेठ येथून रॅली काढत मोठे शक्तीप्रदर्शन केले… उघड्या जिपमधून ते लोकांना अभिवादन करत होते… या रॅलीला प्रतिसाद पाहून काँग्रेस अभी जिंदा है… याचा प्रत्यय कार्यकर्त्यांना आला… एकेकाळी श्रीवर्धन मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता… बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे त्यामागे योगदान होते… मध्यंतरी कणखर नेतृत्व नसल्याने काँग्रेस येथे कमकुवत झाली….मात्र आता राजाभाऊंच्या रूपाने कणखर, धुरंधर, बेडर, समाजभुषित नेतृत्व काँग्रेसला लाभल्याने पूर्वीचेच वैभवाचे दिवस काँग्रेसच्या वाट्याला येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत… राजाभाऊ ठाकूर यांच्या रूपाने काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार असल्याचा अंदाज राजकीय निरीक्षकांचा आहे… येथे पूर्वी काँग्रेसचे पेटत्या निखाऱ्यांच्या रूपात कार्यकर्ते होते… तसेच कार्यकर्ते राजाभाऊंच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला मिळणार आहेत…त्याची झलक श्रीवर्धन मतदारसंघातून राजाभाऊंनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिसून आली…खूप वर्षानंतर श्रीवर्धनमध्ये काँग्रेसचे वादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत… राजाभाऊंना काँग्रेसचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडूनच स्व. मधूकर ठाकूर यांच्याकडून मिळाले आहे… उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपल्या विकासाच्या बोलीने राजाभाऊंनी श्रीवर्धनकरांना जिंकले…राजाभाऊंच्या उमेदवारी अर्ज भरण्यावेळी जी वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघाली… त्या गजराने वयोवृद्ध काँग्रेस कार्यकर्त्यात जोश निर्माण झाल्याचे दिसून येत होते…