पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदिप मोकल ) :-
पेण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार रवींद्र पाटील यांनी भारतीय जनता पार्टी तर्फे उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी प्रविण पवार यांच्याकडे सादर केला… यावेळी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा आदी उपस्थित होते…. पेण विधानसभेसाठी आमदार रवींद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप कार्यालयापासून आमदार रवींद्र पाटील यांच्या निवासस्थानापर्यत शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढली व सभा घेण्यात आली…यावेळी खासदार धैर्यशिल पाटील, आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे,रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील, माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, मंगेश दळवी राष्ट्रवादीचे पेण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकुर, पेण तालुकाध्यक्ष दयानंद भगत आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…नभुतो न भविष्यती अशी रॅली निघाली…शेकापक्ष-काॅग्रेस अशी लढाई होत होती…आज दोन्ही मंडळी एकत्र आली आहेत …आपण ताकदीने चांगले आहोत आपला विजय निश्चित असल्याचे खासदार धैर्यशिल पाटील यांनी सांगितले…
आजची उपस्थिती विजयाची उपस्थिती आहे…विरोधकांकडे उमेदवार नाही…1 लाखाने आपण निवडुन येणार असल्याचे उमेदवार रवीशेठ पाटील म्हणाले…धैर्यशील पाटील आल्याने शेकापक्षही संपला आहे. लोकसभेला 50 हजारांची आघाडी दिली… 1 लाखाची आघाडी घेणार… यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आमदार रविंद्र पाटील यांनी आवाहन केले…
युवकांचे भविष्य चांगले होण्यासाठी भाजपचे उमेदवार रविशेठ पाटील विजयी होणे आवश्यक आसल्याचे भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी सांगितले…यावेळी पेणच्या माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा आदींनी आपली मनोगते व्यक्त केली …