Thursday, November 21, 2024
Homeअपघातआई एकविराचे दर्शन घेऊन परतत असताना मृत्यूने गाठले... ट्रकने मोटारसायकलस्वारला धडक दिली...दोघेजण जागीच गतप्राण...

आई एकविराचे दर्शन घेऊन परतत असताना मृत्यूने गाठले… ट्रकने मोटारसायकलस्वारला धडक दिली…दोघेजण जागीच गतप्राण…

मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):-  

महामार्गांवर होणाऱ्या अपघातांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आता पनवेल सायन महामार्गवर भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे…पनवेल सायन महामार्गवरील करंजाडे हद्दीत भरगाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दोन मोटारसायकल स्वरास जोरदार धडक दिल्याने दोघेजण जागीच गतप्राण झाले आहेत…अशी माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये प्रथम म्हात्रे आणि त्यांची मैत्रीण साक्षी जाधव हिचे भीषण अपघातात दुर्देवी दुःखद निधन झाले आहे. हे दोघेजण लोणावळा येथील आई एकविरा येथे दर्शन घेऊन मुंबई चेंबूर येथे घरी परतत असताना ट्रक आणि मोटार सायकल यांनी जोरात एकमेकांना धडक मारली आणि भीषण अपघात घडून एक तरुण आणि एक तरुणी जागीच गतप्राण झाली…अपघातात मृत पावलेला प्रथम म्हात्रे हा आई वडिलांचा एकुलता एक प्रामाणिक मितभाषी मुलगा गेल्याने चेंबूर, वडाळा, अलिबाग परिसरात शोककळा पसरली. कळंबोली येथील एमजी एम आणि सिव्हिल रुग्णालयात प्रथम म्हात्रे आणि साक्षी जाधव या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे की,शनिवारी सकाळी श्री क्षेत्र आई एकविरा लोणावळा येथे दर्शन करण्यासाठी जिजामाता नगर चेंबूर येथून प्रथम म्हात्रे या तरुणासोबत आणखी त्याचे दोन मित्र आणि मैत्रिणी सोबत मिळून मोटारसायकल वरून गेली होती.आई एकविराचे दर्शन घेऊन, विसावा घेऊन, फिरून वगैरे पुन्हा चेंबूर मुंबई येथील घरी परतत असताना पनवेल सायन महामार्ग जवळील करंजाडे हद्दीत मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने प्रथम म्हात्रे आणि त्याची मैत्रीण साक्षी जाधव यांच्या मोटारसायकलीस मागून जोरदार धडक दिल्याने दोघ जागीत गतप्राण झाली. साक्षी जाधव या तरुणीच्या डोक्याला, मानेला गंभीर इजा झाल्याने आणि प्रथम म्हात्रेच्या मणक्याला आणि हृदयाला गंभीर इजा झाल्याने रुग्णालयात नेण्या अगोदर दोघांनी आपला प्राण गमावला. तिघे मित्र आणि त्यांच्या मैत्रिणी असे एकूण सहा जण होते, बाकीचे दोघ मित्र आणि त्यांच्या मैत्रिणी ह्या काही अंतरावर पुढे गेले असता संध्याकाळी 6 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.प्रथम म्हात्रे हा तरुण चेंबूर जिजामाता येथे राहत होता, प्रथम म्हात्रेने भायखळा येथील औद्योगिक प्रशिक्षणचे शिक्षण आयटियाचे नुसतेच शिक्षण पूर्ण केले असून दसऱ्याच्या दिवशी नवीन मोटारसायकल खरेदी केली होती, प्रथम हा शिकावू मोटारसायकलस्वार होता. त्याला अजूनतरी मोटारसायकलचे पूर्ण प्रशिक्षण घेतले नव्हते. ऐन दिवाळीच्या पूर्व संधेला आई एकविराचे दर्शन करून एक नवीन सुरुवात करणार होता. अत्यंत गरिबीत वाढलेला प्रथम हा मनापासून प्रामाणिक, प्रेमळ, मितभाषी, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा, सगळ्यांच्या सुखा दुःखाला धावून जाणारा, थोरल्या मोठ्यांच्या विचार घेऊन पुढे जाणारा, गणेशोत्सव, नवरात्रौ उत्सव दरम्यान गणपती बाप्पा आणि देवी आईला सजावट, रंग रंगोटी करण्याची कला जोपासत होता. एक स्वाभिमान- स्वाभाविक कलाकार ह्या जगातून कायमचा सोडून गेला. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा गेल्याने म्हात्रे आणि जाधव कुटुंबातील परिवार सोबतच चेंबूर, जिजामाता नगर, वडाळा, मढ, अलिबाग येथे एकच शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments