रायगड शिवसत्ता टाइम्स ( वार्ताहर ) :-
एकही आमदार नसताना शेकापचे रायगडात आडमुठे राजकारण सुरु आहे… त्यामुळे महाविकास आघाडी धोक्यात आली असून याला कारणीभूत शेकापचे नेते जयंत पाटील असल्याचे बोलले जात आहे… जयंत पाटीलांच्या राजकारणामुळे उरण आणि पनवेलमध्ये महाविकास आघाडी फसणार आहे…शेकाप नेते जयंत पाटील सध्या ज्या राजकीय खेळ्या करत आहेत…त्या खेळ्यांचा फायदा महायुतीला होणार आहे…मुळात रायगडात शेकापचा एकही आमदार नाही… अलिबाग ,पेण,उरण ,पनवेलमध्ये शेकापची ताकदही कमी झाली आहे… त्यामुळे शेकापची ताकद वाढविण्याचे धोरण जयंत पाटील यांनी राबविणे गरजेचे आहे… तसे शेकापची ताकद वाढविण्याचे धोरण जयंत पाटील राबविताना दिसत नाहीत…. उलट त्यांच्या स्वभोवती फिरणाऱ्या राजकारणामुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे… शेकापने महाविकास आघाडीत राहून आघाडीची सत्ता आणणे गरजेचे आहे.. उद्या महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर विधानपरिषदेच्या माध्यमातून तसेच स्थानिक स्वराज्य मतदारसंघ,कोकण शिक्षक मतदारसंघ यातून शेकापचे उमेदवार निवडून आणणे सहज शक्य आहे… शेकापला हेच राजकारण तारणारे ठरेल… असे असताना जयंत पाटील स्वतःच्या भविष्यातील विधानपरिषदेच्या सोयीसाठी सुनबाईंना महाविकास आघाडीतून अलिबाग विधानसभा जागा मिळाली असताना विचित्र राजकीय खेळ्या करीत आहेत… त्यामुळे भविष्यात येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सत्तेला धोका निर्माण होऊ शकतो… सध्या शेकापच्या हातात आमदारकीची सत्ता नाही… हि आमदारकीची सत्ता महाविकास आघाडीला मदत करून भविष्यात मिळू शकते… मात्र जयंत पाटील अवसान घातकी राजकरण खेळत आहेत…त्यामुळेच त्यांनी उरणमधून प्रीतम म्हात्रेंना राजकीय बळ दिल्याची चर्चा आहे… असे विचित्र राजकारण महाविकास आघाडीसाठी सोयीचे नाही… जर महाविकास आघाडी तुटली… शेकापला त्यातून बाहेर काढले तर तेलही गेले आणि तूपही गेले… हाती धुपाटणे आले … असे होईल… हे शेकापच्या चतुरस्त्र नेत्याने ध्यानात ठेवावे असा सल्ला महाविकास आघाडीचे वयोवृद्ध,जाणकार ,कार्यकर्ते देत आहेत…