पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी) :-
191 पेण विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षातर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अतुल म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी प्रविण पवार यांच्याकडे दाखल केलाय…शेकाप कार्यालय ते रायगड बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पेण शहरात मिरवणूक काढण्यात आली…यावेळी महात्मा गांधी मंदिर पेण येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते…या सभेला हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते…या ठिकाणी येणा-या प्रकल्पासाठी आमच्या जमिनी तुम्ही कवडीमोल भावामध्ये घेता त्याला आमचा विरोध आहे… आज आमचे म्हणणे फक्त एवढेच आहे की विकासाचा केंद्रबिंदू इथला स्थानिक समाज असला पाहिजे विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्याचा विकास झाला पाहिजे व उद्योजक बनला पाहिजे…विकासाचा केंद्रबिंदू इथला शेतकरी बनला पाहीजे…असे अतुल म्हात्रे यांनी यावेळी सांगितले…यावेळी शेकाप चिटणीस सुरेश खैरे, महादेव दिवेकर व शेकापचे दिग्गज नेते उपस्थित होते…